एसइओ म्हणजे काय – What is SEO in Marathi

 एसइओ म्हणजे काय – What is SEO in Marathi

एसइओ (SEO) हा शब्द ब्लॉगिंग च्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऐकला असेल. या पोस्टद्वारे आपण एसइओ म्हणजे काय – What is SEO in Marathi, एसइओ (SEO) कसे काम करते, ब्लॉगसाठी एसइओ (SEO) का गरजेचा आहे या बद्दल माहिती पाहणार आहोत.

एसइओ म्हणजे काय – What is SEO  in marathi ?

आपल्या ब्लॉगची / वेबसाईट ची सर्च रँकिंग वाढविण्यासाठी, साईट सुधारण्याची प्रक्रिया म्हणजेच एसइओ (SEO) होय.
सर्च इंजिन वरील परिणामांमध्ये आपल्या ब्लॉगची / वेबसाईटची दृश्यमानता (Visibility) वाढविण्याचे व नवीन युसर्स आपल्या ब्लॉगवर आणण्यासाठी एसइओ (SEO) करणे महत्वाचे आहे.

एसइओ (SEO) चे प्रकार :-

एसइओ (SEO) चे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत :-
  1. ऑन-पेज एसइओ (SEO) – (On-page SEO)
  2. ऑफ-पेज एसइओ (SEO) – (Off-page SEO)

एसइओ (SEO) कसे काम करते – How does SEO works ?

इंटरनेटवर अनेक सर्च इंजिन आहेत जसे कि, गुगल, बिंग इ. हे सर्च इंजिने वेबसाईट चे पेजेस क्रॉल करण्यासाठी, एका वेबसाइटवरून दुसऱ्या वेबसाईट वर जाण्यासाठी, वेबपेजेस ची माहिती एकत्रित करण्यासाठी, वेबपेजेस ला सर्च इंजिन मध्ये क्रमांकीत करण्यासाठी सर्च इंजिन्स बॉट्स वापरतात.
सर्च इंजिन चे काही अल्गोरिथम असतात ते अल्गोरिथम्स वेबपेजेसला Analyze(विश्लेशन) करतात आणि रँकिंग चे सिग्नल्स आणि घटक लक्षात घेऊन त्याला शोध परिणामानुसार सर्च इंजिन मध्ये रँक करतात.
एसइओ (SEO) साठी आवश्यक असणारे वेबपेजेस मधील घटक हे सर्च इंजिन चे बॉट्स आणि अल्गोरिथम पहात असतात. ते घटक म्हणजेच तुमच्या ब्लॉग वरील कन्टेन्ट ची गुणवत्ता, कीवर्ड ची मांडणी, वेबपेजेस चा मोबाईल-फ्रेंडली पना इ. पाहिले जातात.
सर्च इंजिनचे अल्गोरिथम्स वापरकर्त्याना (युसर्सना) कार्यक्षम (Efficient) अनुभव देण्यासाठी तयार केले गेले आहेत.
जर, तुम्ही या घटकांना लक्षात घेऊन जर तुम्ही तुमचा ब्लॉग / वेबसाईट ऑप्टीमाईज केली तर तुमच्या ब्लॉग ला शोध परिणामांमध्ये उच्च स्थान मिळू शकते.

ब्लॉगसाठी एसइओ (SEO) का गरजेचा आहे – Why SEO is important for Blogging ?

१. सर्च इंजिन मध्ये ब्लॉग पोस्टची दृश्यमानता वाढविण्यासाठी :-
 
जेव्हा तुम्ही नवीन ब्लॉग तयार करून त्यावरती पोस्ट टाकता त्या पोस्ट ला शोध परिणामांमधील क्वेरीजच्या विस्तृत श्रेणीपर्यंत पोहोचविण्यासाठी एसइओ (SEO) करणे आवश्यक असते.
एसइओ (SEO) तुमच्या ब्लॉग पोस्ट नुसार वैविध्य पूर्ण शोध परिणाम निर्माण करण्याचे कार्य करीत असते.
२. एखादे कीवर्ड सर्च इंजिन मध्ये रँक करण्यासाठी :-
 
आपण जर “ब्लॉग म्हणजे काय ?” या किवर्डवर ब्लॉगपोस्ट रँक करायचा असल्यास तुम्ही एसइओ (SEO) च्या सहाय्यने रँक करता येते.
३. अधिक ब्लॉगपोस्ट सर्च इंजिन मध्ये इंडेक्स करण्यासाठी :- 
 
सर्च इंजिन ब्लॉगची माहिती प्रेक्षकांना जेव्हा त्याला त्या ब्लॉगवरती विश्वास येतो. सर्च इंजिनचा ब्लॉगवरचा विश्वास त्याच्या अनुक्रमित (इंडेक्स) असलेल्या ब्लॉगपोस्ट मुळे तसेच त्या ब्लॉगच्या ऑथॉरिटी मुळे येत असतो.
त्यामुळे, अधिक ब्लॉगपोस्ट सर्च इंजिन मध्ये इंडेक्स करण्यासाठी एसइओ (SEO) करणे आवश्यक असते.
४. ब्लॉगची ऑथॉरिटी बिल्ड करण्यासाठी :- 
 
जेव्हा तुम्ही ब्लॉग लिहिता म्हणजे एखाद्या विषयावर प्रेक्षकांना माहिती देत असता, तुम्ही दिलेली माहिती प्रेक्षक वाचतात तेव्हा तुमची त्या विषयावरील तज्ञ म्हणून ओळख वाढू लागते, त्यामुळे तुमची सर्च इंजिन मध्ये विश्वास आणि ऑथॉरिटी वाढू लागते व ब्लॉगवर ट्रॅफिक भरपूर प्रमाणात येते.

निष्कर्ष

मी आशा करतो कि, तुम्हाला या ब्लॉग मधून एसइओ (SEO) म्हणजे काय ? त्याचे प्रकार आणि फायदे काय आहेत हे माहिती झाले असेल.
जर तुम्हाला या आर्टिकल मधील कोणता मुद्दा नाही लक्षात आला तर एकदा आर्टिकल परत वाचा, किंवा खाली कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा.
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

2 thoughts on “एसइओ म्हणजे काय – What is SEO in Marathi”

Leave a Comment