Accounting terminology in marathi – अकाउंटिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञा

Accounting terminology in marathi – अकाउंटिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञा :- 

Accounting terminology in marathi - अकाउंटिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञा


भांडवल (Capital) :-

व्यवसायाच्या मालकाने व्यवसाय सुरु होण्यासाठी केलेली सुरुवातीची गुंतवणुक होय.

Cash, Building, Furniture,…etc.

देणी (Liabality) :-

व्यवसायाने इतर लोकांना तसेच व्यवसायांना द्यावयाची जी देणी  असतात त्यांना व्यवसायाची देणी (Liabality) असे म्हणतात.

              Ex. Bank Loan…etc.


माल / वस्तु(Goods) :-

व्यवसायामध्ये प्रामुख्याने ज्या वस्तुंची खरेदी अथवा विक्री केली जाते त्या वस्तुंना माल असे म्हणतात.

संपत्ती (Asset) :- 

व्यवसायामध्ये असणाऱ्या सर्व मौल्यवान तसेच किंमती वस्तु तसेच ज्या वस्तु सतत खरेदी अथवा विक्री केल्या जात नाहीत अश्या सर्व वस्तुंना एकत्रितपणे संपत्ती असे म्हणतात.

संपत्तीचे मुख्यत: दोन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. 

१. दृश्य संपत्ती (Tangible Asset)

      उदा. इमारत, मशीनरी, पैसे, इ..(Ex. Cash, Building, Machinary,…etc.)

Current Asset (चल संपत्ती):-

      उदा. Cash, bank, Closing Stock,etc.

Fixed Asset (कायमस्वरुपी संपत्ती):-

      उदा. मशिनरी, फर्निचर इत्यादी.

२. अदृश्य संपत्ती (Intangible Asset) 

      उदा. नावलौकीक, ख्याती….

धनको / देणेकरी (Debtors) :-

    ज्या व्यक्तीला आपण किंवा आपला व्यवसायामधून पैसे द्यावयाचे असतात म्हणजेच जो व्यक्तीआपल्या व्यवसायाकडुन काहीतरी येणे लागतो त्या व्यक्तीस धनको म्हणतात.

ऋणको / येणेकरी (Credetor) :-

    ज्या व्यक्तीकडुन आपण किंवा आपल व्यवसाय काही पैसे येणे असतो म्हणजेच जो व्यक्ती आपल्या व्यवसायाला काहीतरी देणे लागतो त्या व्यक्तीस ऋणको असे म्हणतात.

रोख व्यवहार (Cash Transaction) :-

    व्यवसायामध्ये जर एखादा व्यवहार दुसऱ्या व्यक्ती बरोबर पैश्याच्या स्वरुपात झाला असेल तर त्या व्यवहारास रोख व्यवहार असे म्हणतात. 

उधार व्यवहार (Credit Transaction) :-

    व्यवहारामध्ये एखादा व्यवहार दुसऱ्या व्यक्ती बरोबर जर उधारीवर होत असेल तर त्या व्यवहारास उधार व्यवहार असे म्हणतात.

बुडीत कर्ज (Bad Debts) :-

    व्यवसायाने ज्यांना उधारीवर माल विकला आहे व त्याच्याकडुन येणाऱ्या पैशापैकी जे पैसे मिळणार नाहीत म्हणजे जे पैशे बुडणार आहेत त्यांना बुडीत कर्ज असे म्हणतात.

उचल (Drawings ) :-

    व्यवसायाच्या मालकाने व्यवसायामधून एखादी वस्तु किंवा पैसे स्वत: साठी वापरले तर त्यास उचल असे म्हणतात.

मालकाने वस्तु अथवा पैसे काढुन घेतल्यावर तेवढी रक्कम भांडवला मधून कमी केली जाते. 

अधिक वाचा :- Accounting म्हणजे काय ?

Double Entry System (दुहेरी नोंदणी पद्धती):-

    लेखा (Accounting) म्हणजे पद्धतशीरपणे मांडणी / नोंद अशी व्याखा आपण पाहिजी आहे. लेख्या (Accounting) साठी  आपण जी पद्धत वापरतो , त्या व्यवस्थेलाच आपण दुहेरी नोंदणी पद्धत (Double Entry System) असे म्हणतो.

    दुहेरी नोंद पद्धती (Double Entry System) ची मुलभुत धारणा / गहित अशी आहे की, (या पद्धती मध्ये असे ग्रहित धरले जाते की), प्रत्येक व्यवसायीक व्यवहाराचे आपल्या व्यवसायावर दोन उलट – सुलट परिणाम होत असतात.

        उदा. १) रोख पैसे देऊन माल खरेदी केला. (Goods Purchased for Cash.) या उदाहरणामध्ये     आपल्याकडे काहितरी वस्तु आल्या आणि आपले काही रोख पैसे गेले, म्हणजेच आपल्याकडुन काहीतरी        जाते व आपल्याकडे काहितरी येते.

        उदा. २) “अ” कडुन उधारीवर माल खरेदी केला. (Goods Purchased on credit form “A”.)     या व्यवहारामध्ये आपल्याकडे काहीतरी येत आहे परंतु त्याचवेळी आपणाला “A” या व्यक्तीला आपण काही     रक्कम देणे लागतो.

    दुहेरी नोंद पद्धतीच्या गहितका मुळे प्रत्येक व्यवसायीक व्यवहारांची (Business Transcation) कमीत कमी दोनदा नोंद करावी लागते.

धनको / ऋणको (Debit / Credit) :-

    लेखा (Accouting) म्हणजेच व्यवसायीक व्यवहारांची पद्धतशीरपणे नोंद करताना व्यवसायामध्ये झालेला खर्च व व्यवसायाला होणारे उत्पन्न् हे सर्व दोन वेगवेगळया विभागात नोंद करणे गरजेचे असते.

    प्रत्येक लेख्याला दोन विभाग किंवा दोन बाजू असतात. त्या मध्ये डावी बाजू / विभाग (Debit Side) ही येणाऱ्या साठी असतो, तर उजवी बाजु (Credit Side) ही जाणाऱ्या साठी असते.

        उदा. व्यवसायामध्ये येणाऱ्या रोख रक्कमेसाठी व व्यवसायामधून जाणाऱ्या रोख रक्कमेसाठी दोन            विभाग असतात. डावी बाजू (Debit Side) ही येणाऱ्या रोख रक्कमेसाठी तर उजवी बाजू  (Credit        Side) ही जाणाऱ्या रोख रक्कमेसाठी असते.

Leave a Comment